अजित सावंत यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

January 30, 2014 10:20 PM0 commentsViews: 2748

Image img_189362_ajitsawant34_240x180.jpg30 जानेवारी : काँग्रेसने निलंबित केलेले नेते अजित सावंत यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केलाय. काँग्रेसची साथ सोडलेले अजित सावंत आता ‘आप’चे झाले आहेत. पण अजित सावंत यांच्या आत येण्यानं आपच्या काही नेत्यांना पोटात दुखू लागल्याचं समजतंय.

अजित सावंत यांना ‘आप’मध्ये घेताना आपल्याशी सल्लामसलत का केली नाही यावरुन राज्य पातळीवरचे काही नेते नाराज झाल्याचं समजतंय.

म्हणूनच एकीकडे आपच्या वतीनं अजित सावंत यांच्या स्वागतासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असता त्याचवेळी ‘आप’च्या काही नेत्यांनीं दुसरी पत्रपरिषद घेऊन या स्वागत सोहळ्याला उपस्थित राहाण्याचं टाळलं.

close