राज ठाकरेंविरोधात चौथा गुन्हा दाखल

January 30, 2014 11:29 PM1 commentViews: 2400

Image raj_in_pune_300x255.jpg30 जानेवारी : ‘टोल’फोडीचे सुत्रधार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल झालाय. पुण्यात खेड इथं चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दिवसभरात राज यांच्यावरचा हा दुसरा गुन्हा दाखल झालाय.

आज दुपारी राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अगोदर पुणे जिल्ह्यातच राजगड आणि लोणी काळभोर इथं राज यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. राज ठाकरे सध्या चार दिवसांच्या दौर्‍यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत.

आज दुपारी ते पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या राजमहाल या घरी पोहोचले. पण त्यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या अटकेवरुन राज्य सरकार आणि पोलिसांमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. राज्य सरकारने ही जबाबदारी पोलिसांवर ढकललीय. राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाचा अहवाल विधी आणि न्याय विभागाकडून गृहविभागाकडे येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाईची शक्यता धूसर आहे.

  • ketan

    one man army

close