आज देणार जनलोकपाल विधेयकाला मंजूरी – दिल्ली सरकार

January 31, 2014 10:16 AM0 commentsViews: 489

cm kejriwal31 जानेवारी : भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याची तरतूद असलेले आम आदमी पक्षाचे महत्त्वकांक्षी जनलोकपाल विधेयकाला दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या पाहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मंजुरी सादर करण्याचा सरकारचा विचार आहे. ‘आप’च्या सरकारला सत्तेवर येऊन एक महिना पूर्ण झाला. त्या निमित्ताने केजरीवाल यांनी आपल्या कामाचे लेखा-जोखा वाचण्यासाठी काल पत्रकार परिषदेत घेतली होती त्यात त्यांनी ही घोषणा केली.

विशेष म्हणजे हे अधिवेशन रामलीला मैदानात घेण्याचे सरकारने ठरवले आहे. या विधेयकात वादग्रस्त मुद्दा म्हणजे दिल्ली डेव्हलेपमेंट अथॉरिटी आणि दिल्ली पोलिसांनाही जनलोकपालच्या अखत्यारित आणले आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही जनलोकपालच्या अखत्यारित ठेवण्यात आले आहे.

close