भारतासमोर विजयासाठी ३०४ रन्सचं आव्हान

January 31, 2014 12:03 PM0 commentsViews: 146

new zealand match31 जानेवारी :भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या वन डे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात किवींनी तुफान बॅटिंग करत भारतासमोर विजयासाठी ३०४ रन्सचं आव्हान ठेवले. मालिका गमाविल्या भारताच्या जखमेवर आज विल्यमसन व टेलर यांच्या बॅटिंगमुळे मीठ चोळले गेले. ओपनिंगला आलेल्या विल्यमसन आणि टेलर यांनी 152 रन्सची भागीदारी करून न्यूझीलंडला सुस्थितीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सुरूवातीलाच रोहीत शर्मा अवघ्या ४ रन्सवर  माघारी फिरल्याने भारतीय संघावर दबाव निर्माण करण्यात न्यूझीलंड गोलंदाजांना यश आले आहे. ३०३ रन्सचं आव्हान गाठण्यासाठी भारतीय बॅट्समनना दबावाखाली न खेळता आक्रमक बॅटिंग करावी लागेल. मालिका व एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान गमाविलेल्या भारतापुढे आता हा अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून आपली उरलीसुरली अब्रु वाचविण्याचे आव्हान आहे.

close