‘आप’च्या भ्रष्ट नेत्यांच्या यादीत राहुल-मोदी

January 31, 2014 2:00 PM0 commentsViews: 1539

aap vs delhi police 34564331 जानेवारी : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. नेहमीप्रमाणे याहीवेळी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पेटार्‍यातून ‘स्फोटक’ काढली आहे. यावेळी ‘आप’नं भ्रष्ट नेत्यांची यादी आज जाहीर केली. या यादीमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नावं आहेत. इतर मोठ्या नेत्यांची नावंही या यादीत आहेत.

यामध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी. चिदंबरम, अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, भाजपचे नेते नितीन गडकरी, काँग्रेचे नेते सुरेश कलमाडी हे भ्रष्ट आहेत असा ‘आप’चा आरोप आहे.

तर सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, बसपाच्या अध्यक्ष मायावती, वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी, द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांचाही या यादीत समावेश आहे. भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहेत.
.

‘आप’ चा निशाणा, सगळ्या पक्षांवर आरोप

 • - राहुल गांधी, काँग्रेस
 • - नरेंद्र मोदी, भाजप
 • - पवनकुमार बन्सल, काँग्रेस
 • - अनु टंडन, काँग्रेस
 • - प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस
 • - सुरेश कलमाडी, काँग्रेस
 • - नितीन गडकरी, भाजप
 • - सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस
 • - पी. चिदंबरम, काँग्रेस
 • - सलमान खुर्शीद, काँग्रेस
 • - श्रीप्रकाश जैस्वाल, काँग्रेस
 • - नवीन जिंदाल, काँग्रेस
 • - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
 • - ए. राजा, द्रमुक
 • - अळागिरी, माजी द्रमुक नेते
 • - कनिमोळी – द्रमुक
 • - मायावती, बसपा
 • - जी. के. वासन, काँग्रेस
 • - कमलनाथ, काँग्रेस
 • - फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्स
 • - जगन रेड्डी, वायएसआर काँग्रेस

close