शेवटही कडूच, मालिका गेली लाजही गेली

January 31, 2014 2:58 PM0 commentsViews: 945

NZ vs Ind31 जानेवारी :  न्यूझीलंड दौर्‍यावर पराभवाने सुरुवात केलेल्या टीम इंडियाचा शेवटही कडूच झाला. पाचव्या वनडेतही टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. वेलिंग्टनमध्ये रंगलेल्या पाचव्या वन डेत न्यूझीलंडनं भारताचा 87 रन्सनी पराभव केलाय. या विजयाबरोबरचं भारतानं ही सीरिज 4-0 नं गमावली.

पहिली बॅटिंग करणार्‍या न्यूझीलंडनं भारतासमोर 304 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडतर्फे रॉस टेलरनं शानदार सेंच्युरी ठोकली. टेलरनं 106 बॉल्समध्ये 10 फोर आणि 1 सिक्स ठोकत 102 रन्स केले. तर त्याला चांगली साथ दिली ती केन विल्यमसननं. विल्यमसननं 88 रन्स केले. भारतातर्फे वरूण ऍरॉननं 2 विकेट घेतल्या.

304 धावांचा पाठलाग करणार्‍या भारतीय बॅट्समननं निराशा केली. धवन आणि रोहित हे भारताचे दोन्ही ओपनर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. तर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. विराट कोहली आणि कॅप्टन धोणीनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण इतर बॅट्समनची त्यांना साथ मिळाली नाही. कोहलीने 78 बॉल्समध्ये 7 फोर आणि 3 सिक्स टोकत 82 रन्स केले. तर धोणीने 47 रन्सची इनिंग पेश केली. पण या संपूर्ण दौर्‍यात टीम इंडियाला आपल्या बॅटिंगमध्ये सातत्य राखता आलं नाही. इतकचं नाही तर खराब बॉलिंगचाही टीमला फटका बसलाय. त्यामुळे न्यूझीलंड दौर्‍यात टीम इंडियाला 4-0 अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय.

close