राज ठाकरेंचा ‘ गड ‘ दादरमधून हलणार

February 27, 2009 3:29 PM0 commentsViews: 12

27 फेब्रुवारी, मुंबई अमेय तिरोडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपलं हेडक्वार्टर हलवावं लागणाराय. शिवाजीपार्क इथं अडीच वर्षे राजगड नावाच्या इमारतीत मनसेचं हेडक्वार्टर होतं. पण या इमारतीचे मालक बेलोसकर यांनी जागेचं लीज वाढवण्यास नकार दिला. राजकीय कार्यालयातील वर्दळीमुळं या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना त्रास होत होता. त्यामुळं त्यांनी मनसेचं लीज वाढवण्यास नकार दिला. या इमारतीचा संपूर्ण पहिला मजला मनसे वापरत होती. पण लीज वाढवून न मिळाल्यामुळं आता शेजारच्या मातोश्री टॉवरमध्ये मनसेचं हेडक्वार्टर हलवलं जाणार आहे. मातोश्री टॉवर ही बिल्डिंग मनसेचे नेते राजन शिरोडकर यांच्या मालकीची आहे. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर मनसेचं कार्यालय असणार आहे.

close