परभणीत अंगणवाडी सेविकांचं रेल्वे रोको आंदोलन

January 31, 2014 7:14 PM0 commentsViews: 222

2353252 parbhani aganvadi 34531 जानेवारी : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्षच करतंय. परभणीतल्या अंगणवाडी सेविकांनी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अमानुषपणे लाठीकाठीनं ढकलत रेल्वे स्थानकाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काही महिला खाली पडून किरकोळ जखमी झाल्या. त्यामुळे परभणी रेल्वे स्थानक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अंगणवाडी सेविकांनी रेल्वे स्टेशन परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार, वर्षा गायकवाड, फौजिया खान या मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

त्यावेळी त्यांनी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांचा रेल रोकोचा प्रयत्न हाणून पाडलं. आणि आंदोलनासाठी जमलेल्या अंगणवाडी सेविकांना अमानुषपणे लाठ्याकाठ्यांनी ढकलत स्टेशनबाहेर काढले. पोलिसांच्या दादागिरीमुळे नंतर महिलांनी आंदोलन आटोपतं घेतलं.

close