4 फेब्रुवारीला सचिन आणि सीएनआर राव यांना भारतरत्न प्रदान

January 31, 2014 7:39 PM0 commentsViews: 515

346sachin and cnr rao31 जानेवारी : गेली दोन दशक क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिकाराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 4 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसंच यावेळी ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ प्राध्यापक सीएनआर राव यांनाही भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

4 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनात दुपारी 12 वाजता पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी सचिन नावाचं वादळ शमलं. सचिनने आपल्या घरच्या मैदानावर अखेरची 200 वी कसोटी खेळून क्रिकेट जगताला अलविदा केलाय. पण सचिनला यावेळी केंद्र सरकारने अनोखी भेट दिली. देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न सन्मान सचिनला जाहीर करण्यात आला.

सचिनसोबत रसायन शास्त्रज्ञ सी.एस.आर.राव यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला आहे. भारतरत्न मिळालेला हा सचिन पहिला खेळाडू ठरलाय. याआधीही महाराष्ट्रातल्या सात मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. त्यात सचिन हा आठवा महाराष्ट्रीयन ठरला आहे ज्याला हा सन्मान जाहीर झालाय.

तर ज्येष्ठ भारतीय रसायनशास्त्रज्ञ सी.एन.आर राव यांनाही भारतरत्न पुरस्कार यावेळी जाहीर झाला होता. चिंतामणी नागेश रामचंद्र राव असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. घन स्थिती आणि संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. सध्या ते पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. 79 वर्षांच्या राव यांनी त्यांच्या पाच दशकांच्या कार्यकाळात तब्बल 45 पुस्तकं आणि 1500 रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत.

 

कानपूर आयआयटी आणि बंगरुळू मधल्या भारतीय विज्ञान संस्थेत त्यांनी प्राध्यापकाचं काम केलंय. केंद्रसरकारनं यापुर्वी त्यांना पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्कारानं गौरवलेलं आहे. सोबत वेगवेगळ्या संस्थामध्ये त्यांनी मानाची पदं भूषवली आहेत. भारतामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी आणण्यात राव यांची महत्त्वाची भूमिका होती. जगभरातल्या मानाच्या तब्बल 40 युनिव्हर्सिटीजनी राव यांना मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे.

close