नाशिकमध्ये मारामारीत विद्यार्थ्याचा मृत्यू

February 27, 2009 3:35 PM0 commentsViews: 10

27 फेब्रुवारी , नाशिकनिरंजन टकले शाळकरी विद्यार्थ्यांच्या मारामारीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव अक्षय पुट्टी आहे. तो पंधरा वर्षांचा असून नाशिकमधल्या सेंट फ्रान्सिस शाळेत शिकत होता. त्याचं संकेत विखणकरशी बसण्याच्या जागेवरून बाचाबाची झाली. त्यातून दोघांची मारामारी जुंपली. या मारामारीत अक्षयच्या डोक्यात रक्तस्त्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. सेंट फ्रान्सिस शाळेत घडलेल्या या सगळ्या घटनेनंतरही अजूनपर्यंत शाळेच्या प्रशासनाकडून काहीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

close