94 व्या नाट्य संमेलनाची ‘पहिली घंटा’

February 1, 2014 3:37 PM0 commentsViews: 392

natya samelan01 फेब्रुवारी : 94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला पंढरपूरनगरीत सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना नाट्यपरिषदेचे अभिनय संकुलासाठी पाच एकर जमिनीची मागणी मोहन जोशींनी संजय देवतळे यांच्याकडे केली. सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी आपल्या भाषणातच गोरेगाव फिल्मसिटीत जागा देण्याची घोषणा केली. तसंच 3 कोटी 75 लाखांचा चेक नाट्यपरिषदेकडे सुपूर्द करणार आहे.

रत्नागिरीतल्या नाट्यसंमेलनात अजित पवारांनी ही घोषणा केली होती. तसंच नाट्यसंमेलनासाठी 25 लाख रुपयांचा चेकही त्यांनी सरकारतडून सुपूर्द केला आहे. संमेलनाच्या निमित्ताने अनेक कलाकार यासाठी पंढरपुरात आलेले आहेत.

नाट्यसंमेलनाध्यक्ष अरुण काकडे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी,सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, हर्षवर्धन पाटील, आरपीआयचे नेते रामदास आठवले, आमदार भारत भालके उपस्थित आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र संमेलनाच्या उद्घानाकडे पाठ फिरवली. यावेळी मोहन आगाशे यांनीनी अरुण काकडे ह्यांचेकडे केली सुपूर्द केलीय. आज दुपारी डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार आणि कलाकार यांचे अभिरुप न्यायालय भरणार आहे. तर संध्याकाळी कलावंत रजनीचा कार्यक्रम आहे.

close