ऑटोरिक्षा युनियनचा परिवहन कार्यालयावर भव्य मोर्चा

February 1, 2014 12:45 PM0 commentsViews: 179

346mumbai auto01 फेब्रुवारी : कामगार नेते शरद राव यांच्या मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनच्या वतीने बांद्रा येथील परिवहन आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन काढण्यात आला होता. यावेळी हजारो रिक्षा चालक सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनातर्फे ऑटोरिक्षाचालकांसाठी नवीन 69 हजार परवान्यांचं वाटप करण्यात येणार आहे.

यातल्या 21 हजार परवान्यांचं वाटप हे मुंबई होणार आहे. मात्र या सर्व परवान्यांचं वाटप ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आलंय. यामध्ये अनेक त्रुटी आहेत याशिवाय या नवीन परवान्यासाठी अनेक जाचक अटीही घालण्यात आल्या आहेत. या विराधात या मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं.

close