कसाब समुद्रमार्गे भारतात गेलाच नाही : पाकिस्तानच्या नौदल प्रमुखांचा दावा

February 27, 2009 3:43 PM0 commentsViews: 4

27 फेब्रुवारी मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्ताननं पुन्हा कोलांटीउडी मारलीय. मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब हा कराचीतून समुद्रमार्गे मुंबईत गेलाच नाही, असा दावा पाकच्या नौदलप्रमुखांनी केला आहे. नौदलप्रमुख ऍडमिरल नोमान बशीर यांनी पत्रकार परिषद घेतली. कसाब समुद्रमार्गे भारतात गेल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं बशीर यांनी सांगितलं. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याच्या अगदी उलट हे विधान आहे. मुंबई हल्ल्याची घटना ही भारतीय नौदलाचं अपयश असल्याचंही नोमान बशीर यांनी म्हटलंय. कसाब आणि त्याचे साथीदार समुद्रमार्गानं आले असतील तर भारतीय नौदलाच्या तावडीत ते सापडले का नाहीत, असा प्रश्नही बशीर यांनी विचारला.

close