काँग्रेस-राष्ट्रवादीतला जागावाटपाचा तिढा कायम

February 28, 2009 5:24 AM0 commentsViews: 1

28 फेब्रुवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत कुठल्याही निर्णय होऊ शकला नाही. आता 2 मार्चला पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येणारआहेत. त्यावेळी पुन्हा एकदा जागा वाटपावर चर्चा करण्यात येईल. मात्र लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची प्रक्रिया 5 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी केला आहे. बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, दोन्ही पक्षामध्ये अत्यंत खेळीमेळीच्या स्वरूपात बैठक झाली. काही जागाबद्दल चर्चा झाली तर काही जागाची बोलणी अजून पूर्ण व्हायची आहे. आता 2 तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही तर अजून एक बैठक होऊ शकते आणि त्यानंतरच जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय होईल.बैठक जरी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असं बोललं जातं असलं तरी काँग्रेस 27-21 तर राष्ट्रवादी 24-24 या जागाच्या वाटपाबाबत अजूनही ठाम आहेत. एकूण 6 जागांवर दोन्ही पक्ष आपापला दावा सांगत असल्यामुळे हा तिढा कायम आहे. आता ह्या जागाबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत दोन्ही पक्षाचे हाय कमांड करतील असं बोललं जातं.