मादाम तुसाँच्या संग्रहालयात सचिनची एण्ट्री

February 28, 2009 6:17 AM0 commentsViews: 2

28 फेब्रुवारी बीसीसीआयनं जरी सचिनला टी- 20 मॅच खेळण्याची परवानगी नाकारली असली तरीही सचिनसाठी एक खुशखबर आहे. मेणाच्या पुतळ्यांसाठी जगप्रसिध्द असलेल्या लंडनमधील मादाम तुसाँच्या संग्रहालयात आता सचिनची हसरी प्रतिमा झळकणार आहे. सचिनच्या मेणाचा पुतळा बनवण्याचं काम पूर्ण झालंय. येत्या एप्रिलमध्ये त्याचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे. मादाम तुसाँच्या संग्रहालयात यापूर्वी सिनेस्टार अमिताभ आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचे पुतळे झळकले आहेत. पण एखाद्या भारतीय खेळाडूचा मेणाचा पुतळा मादाम तुसाँच्या संग्रहालयात ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

close