लोकसभा निवडणुकीनंतर पुढचा पर्याय बघू -पटेल

February 1, 2014 9:11 PM0 commentsViews: 823

2345 patel 346301 फेब्रुवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली. शरद पवार यांनी भेटीचं वृत्त फेटाळून लावलंय. पण यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढवत आहे.

राष्ट्रवादी सध्या यूपीएचा घटक आहेच पण आजपर्यंत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी येऊन सरकार बनवलेलं आहे. हे चित्र यावेळीही बदलेले असं काही दिसतं नाही. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर पुढचा पर्यायाचा विचार करु असं सुचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलंय.

तसंच गुजरातमध्ये झालेल्या 2002 च्या दंगलींबाबत कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा असं पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेससोबत वाटाघाटी करतो आहोत. त्यात भाजप कुठे आला, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. जिथं भाजपची शक्ती केंद्रं आहेत, त्याच राज्यांत भाजपचा प्रभाव पडेल. आपचा तर अजिबातच परिणाम होणार नसल्याचा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. जागावाटपावरुन पटेल यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. आज पुन्हा पटेल यांनी वेगळी भूमिका मांडून विषय संपला नाही असं स्पष्ट केलंय.

close