केजरीवाल, आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या -सिब्बल

February 1, 2014 9:05 PM1 commentViews: 630

sibal on kejri 346301 फेब्रुवारी : केजरीवाल यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत त्यांनी जर एक जरी आरोप सिद्ध केला तर राजकारण सोडून देईन, मात्र ते सिद्ध न केल्यास केजरीवाल यांना ताबडतोब राजीनामा द्यावा असं थेट आव्हान काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी दिलंय. केजरीवाल यांना आरोप सिद्ध करण्यासाठी सिब्बल यांनी 2 दिवसांची मुदत दिलीय.

 

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्ट मंत्र्यांची यादी तयार केलीय. त्यात कपील सिब्बल यांचही नाव आहे. त्याला सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावरचे केजरीवाल यांचे आरोप बिनबुडाचे आहे. केजरीवाल मुद्दाम काँग्रेस नेत्यांवर आरोप करत आहे. ज्यामुळे आम्ही दिल्लीत त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा आणि नंतर त्याद्वारे सगळं खापर काँग्रेसच्या माथी फुटावं असा आरोपही सिब्बल यांनी केला.

 

शुक्रवारी केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडले. यावेळी त्यांनी भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर करुन खळबळ उडवून दिली. आपने आपल्या यादीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी. चिदंबरम, अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, भाजपचे नेते नितीन गडकरी, काँग्रेचे नेते सुरेश कलमाडी याची नाव जाहीर केली. केजरीवाल यांच्या नवीन नाट्यामुळे भाजपचे नेते नितीन गडकरी चांगलेच संतापले त्यांनी आता यांनी केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. आता थेट सिब्बल यांनी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.

  • Eknath More

    brastcharache aaroap karun chanda vasul karnare swghoshit swcha manus daud , gavali sathi yachya pkshat jaga aahe kashala yanchy gyng made tu swata samil ho

close