मोनोरेलचा पहिल्याचं दिवशी फ्लॉप शो!

February 2, 2014 2:33 PM1 commentViews: 8015

MONO 1st02 फेब्रुवारी : देशातील पहिली आणि मुंबईकरांची मोनोरेल आजपासून मुंबईत धावायला लागली पण पहिलाच शो फ्लॉप ठरला. सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल पहिल्याच दिवशी तासाभराने उशिराने निघाली. त्यात वाढत्या गर्दीमुळे सगळे स्टेशन वेळच्या एक तासाआधीच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी निराश होऊन परतावे लागले.

शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. ठरल्याप्रमाणे मोनोरेल 2 फेब्रुवारी रोजी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. आज रविवार म्हणजे नोकरदारांचा सुट्टीचा दिवस त्यामुळे मोनोरेलच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी सकाळी सहा पासून मोनोरेल स्टेशनवर रांगा लावल्या होत्या. पण पहिल्या दिवशीच ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसला. काही तांत्रिक कारणामुळे भारत पेट्रोलियम इथल्या प्लॅटफॉर्मवर मोनोरेलला काही वेळासाठी थांबली होती. त्यामुळे सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल पहिल्याचं दिवशी तब्बल तासाभराने निघाली आणि वाढती गर्दी लक्षात घेता दुपारी वेळे आधीच स्टेशन बंद करण्यात आले. ज्यांनी तिकीट काढले आहेत. त्यांनाच आज प्रवास करता आला. त्यामुळे मुंबईकरांची निराशा झाली आहे.

तासभर उशिराने सुरू होऊन वेळेच्या आधीच बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय तर झालीच पण कुठेही लवकर पोहचण्यासाठी या मोनोवर कितपत अवलंबून राहता येईल यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


  • Rahul Ahire

    Right ….. But We shuld have to appreciate for this project….

close