रणजीत कर्नाटक चॅम्पियन, महाराष्ट्राच्या स्वप्नांचा चक्काचूर

February 2, 2014 6:06 PM0 commentsViews: 228

ranji match02 फेब्रुवारी : तब्बल 21 वर्षांनी रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करणार्‍या महाराष्ट्र टीमचं जेतेपदाचं स्वप्न मात्र भंगलं आहे. फायनलमध्ये कर्नाटकने महाराष्ट्राचा 7 विकेट राखून पराभव केला. महाराष्ट्राची दुसरी इनिंग 366 रन्सवर ऑलआऊट झाली आणि कर्नाटकसमोर 156 रन्सचे आव्हान ठेवण्यात आले. पण विजयाचे हे सोप आव्हान कर्नाटकने 3 विकेटच्या मोबदल्यात पार केलं.

रॉबिन उत्थपा, रोकेश राहुल आणि अमित वर्माने दमदार बॅटिंग करत कर्नाटकला रणजीचे सातवे जेतेपद मिळवून दिले. शतकी खेळी करणा-या कर्नाटकच्या लोकेश राहुल याला सामनावीराचा किताब देण्यात आला. यापूर्वी कर्नाटकने १४ वर्षांपूर्वी रणजीचे जेतेपद पटकावले होते.

close