94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा समारोप

February 2, 2014 6:28 PM0 commentsViews: 226

94 natyasaelan02 फेब्रुवारी :  पंढरपुरात 94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा समारोप आज होत आहे.या समारोपाला जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे,राज्यमंत्री उदय सामंत, नाट्यसंमेलनाध्यक्ष अरुण काकडे, नाटयपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी,ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख उपस्थित आहेत.

यावेळेस, सीमाभागातील (बेळगावमधील)मराठी लोकांची सुद्धा तिथे नाट्यसंमेलन व्हावे अशी इच्छा विधी व न्याय राज्यमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यंदाच्या नाट्यसंमेलनाविषयी भरभरुन बोलले.संमेलनाबद्दल मी आनंदी असून कामातूनच व्यक्त होईन असं मत त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केलं.

close