खोडद इथल्या दुर्बीण प्रकल्पामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन

February 28, 2009 8:58 AM0 commentsViews: 72

28 फेब्रुवारी जुन्नररायचंद शिंदे28 फेब्रुवारी हा दिवस भारतभर विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातोय. या निमित्ताने पुणे जिल्हयातील नारायणगाव जवळच्या खोडद इथल्या जागतिक दुर्बीण प्रकल्पामधे दोन दिवस विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे सर्वसामान्यांसाठी हा दुर्बीण प्रकल्प पाहण्याची नामी संधी या निमित्तानं उपलब्ध होणार आहे.खोडद इथला सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प टाटा मुलभूत संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र यांच्यावतीने उभारण्यात आला आहे. विज्ञानाबद्दल ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी. यासाठी मागील 7 वर्षांपासून या ठिकाणी विविध कार्यकम होत असतात. खोडद दुर्बीण प्रकल्पाचे प्रशासन अधिकारी जे. के. सोळंकी सांगतात, दोन दिवस हा प्रकल्प पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला असणार आहे. दरवर्षी 28 फेब्रुवारीला अनेक ठिकाणहून लोक हा प्रकल्प पाहण्यासाठी येतात. त्यामुळे खोडद प्रकल्प आता प्रसिध्दीस आला आहे.प्रदर्शनाबरोबरच शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. तसंच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेलं प्रकल्प मांडण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे. फक्त संशोधनावरच भर न देता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं खोडद रेडिओ दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शानाचं आयोजन केलं जातं आहे.

close