महिला पोलिस कॉन्स्टेबलची पोलिस ठाण्यातच आत्महत्या

February 2, 2014 1:55 PM0 commentsViews: 292

shoot-suicide02 फेब्रुवारी : ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांनी पोलिस ठाण्यातच सर्व्हिस रिवॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

 
पोलिस कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांची शनिवारी नाईट ड्यूटी होती. रात्री उशीरा पिंगट यांनी सर्व्हिस रिवॉल्वरने स्वतःवर गोळी झा़डून घेतली. आत्महत्येपूर्वी पिंगट यांनी पोलिस ठाण्यातच सुसाईड नोट लिहून ठेवली असून ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात केली आहे. अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

close