मुंबई मराठी माणसाचे सासर आहे का? – राज ठाकरे

February 3, 2014 2:15 PM0 commentsViews: 3381

raj-thackeray_350_07241210412003 फेब्रुवारी : ‘नरेंद्र मोदी मुंबईत येऊन म्हणतात, मुंबई हे गुजराथ्यांचं माहेरघर आहे, तर मग मराठी माणसांचे मुंबई काय सासर आहे’? असा खोचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. लालबाग परळला रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या महामेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्येक्रमात राज यांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली.

मुंबईतील लालबाग परळसारख्या मराठी माणसांच्या विभागात सर्वाधिक टॉवर्स उभारून मराठी माणसाला हद्दपार करणार्‍या जैन समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा देणार्‍या सरकारने आता मुंबईतल्या मराठी माणसालाचं अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली.

मुंबईत झालेल्या महागर्जना रॅलीतल्या मोदींच्या भषणाचा संदर्भ घेत, ‘भाजपची शिवसेनेबरोबर इतक्या वर्षांपासून युती आहे हे माहिती असून देखील मोदी महाराष्ट्रात येतात आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचं नावही घेत नाहीत. शिवाय यावर कोणीच कसा आक्षेप घेत नाही’ असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपलाही लक्ष्य केलं.

‘टोल आंदोलन फक्त निवडणुकीसाठी नाही, यापूर्वी केलेल्या आंदोलनामुळे 65 टोलनाके बंद पडल्याचं ते म्हणाले. तसंच 9 फेब्रुवारीला पुण्यात होणार्‍या सभेत आपली भूमिका मांडणार असून त्यानंतर महाराष्ट्रात काय धुमाकुळ घालतो ते पहाचं’ असा इशारा राज यांनी दिला.

close