अमेरिकन अर्थव्यवस्था संकटात

February 28, 2009 9:12 AM0 commentsViews: 2

28 फेब्रुवारी अमेरिकन अर्थव्यवस्था आता संकटाच्या गर्तेत सापडलेली दिसत आहे. नुकतीच अमेरिकेत अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दराची म्हणजे जीडीपी दराची आकडेवारी जाहीर झाली. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर 6.2 % झाला आहे. ह्या आकडेवारीमुळे सर्वत्र निराशा पसरली. 1991 सालानंतर पहिल्यादांच अमेरिकेच्या जीडीपी दरांमध्ये एवढी मोठी घसरण झालेली दिसत आहे. या घसरणीचा परिणाम अमेरिकन शेअरमार्केटवरही दिसला. जीडीपी दरातल्या घसरणीमुळे शेअरमार्केट इंडेक्सनीही गेल्या बारा वर्षातला सर्वात खालचा स्तर गाठला. ग्राहकांच्या खरेदी क्षमतेचा आणि इतर उद्योगांच्या विकासाचा वेग मंदावल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर रोडावल्याचं अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय.

close