सीएनजीच्या दरात 15 रुपयांची कपात

February 3, 2014 3:21 PM0 commentsViews: 1528
cng price hiked03 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक दिलासादायक घोषणा केली. सीएनजीचे दर 15 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्याचबरोबर एकाच किंमतीत सर्व राज्यांना सीएनजी उपलब्ध करुन देणार असल्याचं ही केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं. याआधी गेल्याच आठवड्यात सरकारनं घरगुती सिलेंडरची मर्यादा 9 वरून 12 केली होती.
त्यानंतर सरकारची ही दुसरी महत्त्वाची घोषणा आहे. दरम्यान, या घोषणेचा येत्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचा दावा पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईलींनी केलाय.
close