काँग्रेसच्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट ?

February 3, 2014 4:22 PM1 commentViews: 5776

cm and manikrao03 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला काँग्रेसने तयारी सुरू केलीय. राज्यात काँग्रेसच्या विद्यमान 5 खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी नव्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जागा आपल्याकडेच ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत.

तसंच राष्ट्रवादीप्रमाणेच दोन ते तीन मंत्र्यांना लोकसभेसाठी उतरवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून जागांच्या आदलाबदलीमध्ये हिंगोली आणि रावेर या दोन जागा सोडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे.काँग्रेसच्या छाननी समितीची दोन दिवसीय बैठक संपलीय.

यात राज्यातल्या 48 लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींची भेटही घेतलीय.

या भेटीत राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या दबावानंतर काँग्रेसनं राज्यातल्या 48 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत हा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा आग्रह प्रदेश काँग्रेसनं हायकमांडकडे धरला, त्यानुसार राष्ट्रवादीबरोबरच्या जागावाटपात एखादी दुसरी जागा पदरात पाडून घेण्याचं निश्चित झालंय.

  • rahulil.com

    jinknar ekahi nahi tumhi.. kitihi paisa chara

close