राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षतेची कास सोडणार नाही -पवार

February 3, 2014 3:42 PM0 commentsViews: 1527

sharad pawar4403 फेब्रुवारी : राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षतेची कास सोडणार नाही असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं. शरद पवार यांनी आज (सोमवारी) मुंबईत प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत सात मतदारसंघाचा पुन्हा आढावा घेण्यात आला.

मावळ, शिरूर, नगर, जळगाव, रावेर, परभणी आणि बीड या मतदारसंघातल्या प्रमुख नेत्यांशी शरद पवार चर्चा केली. जागावाटपाला काँग्रेस वेळ लावतोय असं राष्ट्रवादीकडून सातत्यानं सांगितलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर पवारांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.

राज्यात द्वेषाचं राजकारण कधी नव्हतं मात्र, विरोधीपक्षांनी ते राजकारण आता राज्यात सुरू केल्याची कडक टीका शरद पवार यांनी केलीय. राजकारणात टीकेला स्थान आहे. मात्र नेत्यांच्या हातात आसूड देण्याची घटना कधी घडली नव्हती असं म्हणत त्यांनी महायुतींच्या नेत्यांवर टीका केली. येणार्‍या निवडणुकीनंतर देशाला स्थिर सरकार मिळणं गरजेचं आहे. काँग्रेस आणि मित्र पक्षांनी देशाला असं सरकार दिलंय आणि पुन्हाही लोक संधी देतील असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.

close