महिला क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय टीम सज्ज

February 28, 2009 12:51 PM0 commentsViews: 6

28 फेब्रुवारी मुंबईवर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी भारताची महिला क्रिकेट टीम सज्ज झालीय. ऑस्ट्रेलियामध्ये 7 मार्चपासून महिलांचा वर्ल्ड कप सुरू होतोय. या निमित्तानं मुंबईत भारतीय महिला क्रिकेट टीमची पत्रकार परिषद झाली. कॅप्टन झुलन गोस्वामीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय महिला टीमनं या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे. बरोबर चार वर्षापूर्वी झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला टीमला ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव पत्करावा लागला होता. पण या चार वर्षात भारतीय टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. एका नव्या आत्मविश्वासासह ही टीम ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कपला रवाना होतेय. भारतीय टीमसोबत इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान बी ग्रुपमध्ये आहे.

close