सातार्‍यात राष्ट्रवादीचा तवा रिकामाच !

February 3, 2014 8:57 PM0 commentsViews: 6173

03 फेब्रुवारी : निवडणुकीच्या रिंगणात भाकरी करपू नये म्हणून ती बदलावी हा राष्ट्रवादीच्या पवार साहेबांचा राजकीय मंत्र. पण सातार्‍यात मात्र अजून तरी राष्ट्रवादीचा तवा रिकामाच आहे. कारण अर्थातच राजे. लोकशाहीतही राजेशाही मिरवणारे सातार्‍याचे खासदार उदयन राजे भोसले यांचं तळ्यातमळ्यात सुरूच आहे. राष्ट्रवादीतून त्यांच्या उमेदवारीसाठी सातरच्या दिग्गजांनी विरोध केलाय. विशेष म्हणजे, खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या दरबारातही उदय राजेंनी हजेरी लावली नाही. त्यामुळे तव्यावर भाकरी नाही आणि भाकरीला तवा नाही अशी सातार्‍यातल्या राष्ट्रवादीची परिस्थिती आहे.

close