..आणि राहुल गांधी आंदोलनात ‘सामील’

February 3, 2014 10:12 PM1 commentViews: 1621

343464 rahul gandhi janatr03 फेब्रुवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कधी शेतकर्‍याच्या घरी पोहचता, तर कुठे गरिबाच्या घरी जाऊन जेवण करतात आपल्या या ‘अचानक भेटी’मुळे राहुल गांधी नेहमी चर्चेत राहिले . आज (सोमवारी)ही राहुल गांधींची अशीच गांधीगिरी पाहण्यास मिळाली.

राहुल यांनी आज (सोमवारी) अचानक दिल्लीतल्या जंतरमंतरवर जात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याठिकाणी त्यांनी आंदोलन करणार्‍या ईशान्य भारतातल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. निडो तानिया या 19 वर्षाच्या अरुणाचल प्रदेशातल्या विद्यार्थ्याचा दिल्लीत गेल्या आठवड्यात मृत्यू झाला.

दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकणातल्या दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीला राहुल गांधींनी पाठिंबा दिला. याठिकाणी त्यांनी एक छोटसं भाषणही केलं. आणि कारवाईचं आश्वासनही दिलं.

  • Dayaram Patil

    Rahulji ! we peoples in the co – op fields also waiting for our right RBI/ dicgc act is wrongly treats our deposits receipts as a single holder receipts in the process of bank’s liquidation. This is a big human right violence in the world. deposit gaurranty of rs1 lack is poorest in the world. ever yours Jalgaon nagari bahuuddeshiy institutions Jalgaon.

close