सचिन तेंडुलकर आणि सीएनआर राव यांचा आज ‘भारतरत्न’ने गौरव

February 4, 2014 10:46 AM0 commentsViews: 271
sachin And CNR Rao04 फेब्रुवारी : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी. एन. आर. राव यांना आज (मंगळवारी) येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेला सचिन भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणारा पहिला खेळाडू ठरला आहे. राव हे पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. 1954 पासून आतापर्यंत 41 जणांना ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आले आहे.
close