सातारा-पुणे रोडवर अपघात, 10 जण ठार

February 4, 2014 9:29 AM0 commentsViews: 715

pune satara accident04 जानेवारी : सातारा-पुणे रोडवर पारगाव खंडाळ्याचा बोगद्याजवळ काल रात्री साडे नऊच्या सुमारास एक ट्रॅव्हल बस खड्‌ड्यात कोसळली. या अपघातात 10 जण ठार तर 42 जण जखमी झाले आहेत. यात जखमींपैकी 18 जणांची प्रकृती गंभीर असुन मृतांमध्ये 7 महिलांचा समावेश आहे.

जखमींवर खंडाळा व शिरवळ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्व प्रवासी गुजरातमधल्या पोरबंदर इथले रहिवासी आहेत चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला असल्याचे कळतय. पारगाव खंडाळ्याचा बोगदा पार केल्यानंतर धोक्याच्या वळणावर असलेला खड्डा ड्रायव्हरला दिसला नाहि त्यामुळे गाडी 20 फुट खाली कोसळली.

हि बस 25 दिवसांनपूर्वी दक्षिण भारतातातील देवदर्शन करयला निघाली होती. सगळी यात्रा पूर्ण करूण आजते मुंबईच्या दिशेने निघाले होते.

close