महात्मा गांधींच्या वस्तूंचा लिलाव रोखण्याचा सरकारचा निर्णय

February 28, 2009 10:20 AM0 commentsViews: 2

28 फेब्रुवारी महात्मा गांधी यांच्या वैयक्तिक वस्तूंचा लिलाव रोखण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे. 4 मार्चच्या पहिल्या आठवड्यात या वस्तूंचा लिलाव न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. गांधीजींचा चष्मा, चपला, खिशातलं घड्याळ, आणि ताट वाटी या वस्तूंचा लिलाव होणार आहे. महात्मा गांधीच्या या वस्तू आता भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भारत सरकारपुढे तीन पर्याय खुले आहेत. फक्त भारतालाच या वस्तू विकण्यासाठी सध्याच्या मालकाचं मन वळवणं दुसरा पर्याय म्हणजे लिलावात बोली लावणं आणि तिसरा पर्याय म्हणजे एखाद्या एनआरआय संस्थेला बोली लावायला सांगणं आणि नंतर त्यांना त्या वस्तू भारताला दान करायला सांगणं असे तीन सद्यातरी उपलब्ध आहेत.

close