जेटलींच्या घराबाहेर ‘आप’चा ‘राडा’

February 4, 2014 2:11 PM0 commentsViews: 913

aap protest04 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवारी) भाजप नेते अरुण जेटली यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केला. जेटली ‘आप’चं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत शेकडो ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत अशोका रोडवरील जेटलींच्या निवासस्थानबाहेर जोरदार निदर्शनं केली.

आप सरकार पाडण्यासाठी नरेंद्र मोदींच्या एका निकटवर्तीयानं आपल्याला 20 कोटी रुपयांची लाच द्यायचा प्रयत्न केला, असा आरोप ‘आप’चे आमदार मदन लाल यांनी सोमवारी केला होता. पक्ष सोडण्यासाठी हा प्रकार घडल्याचं ‘आप’चं म्हणणं आहे. याच्या निषेधार्थ आपच्या कार्यकर्त्यांनी जेटली यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली.

दरम्यान, या निदर्शनांबाबत माहिती मिळताच ‘आप’ला विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जेटलींच्या घरासमोर जमले. त्यामुळे दिल्लीत सध्या आप आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले आहे.

close