भाजपच्या नेत्याची गुंडगिरी, तीन घरं केली उद्धवस्त

February 4, 2014 4:35 PM0 commentsViews: 1218

bjp nagpur04 फेब्रुवारी : नागपूरच्या हिंगणा परिसरात गुंडाच्या मदतीने स्थानिक भाजपचे नेते अशोक जाधव आणि दिलीप जाधव यांनी तीन घरं जबरदस्तीने रिकामी करून घेतल्याची घटना घडलीय. सोमवारी सकाळी 9 च्या सुमाराला 25 ते 30 गुंडांनी धोटे आणि त्यांच्या शेजारी राहणार्‍या दोन कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण केली.

जेसीबी मशीन आणून धोटे यांचं घरही पाडून टाकलं. पोलीस पोहचल्यानं गुंडांनी तिथून पळ काढला. पण जाण्यापूर्वी धोटेंचं घर या लोकांनी पूर्णपणे उद्धवस्त केले. धोटेंच्या शेजारी राहणार्‍या दोन घरामधीलं सामान गुंडांनी रस्त्यावर फेकून दिलं.

एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात भाजपचे स्थानिक नेते अशोक जाधव आणि 25 ते 30 गुंडांविरोधात मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भात अशोक जाधव यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद करून ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.

close