मुख्यमंत्रीपद विभागून मिळावं- राष्ट्रवादी काँग्रेस

February 28, 2009 4:12 PM0 commentsViews: 1

28 फेब्रुवारी पुणेसद्या महाराष्ट्रात, लोकसभेच्या जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील याबाबत मित्रपक्ष ऐकमेकांवर दबावतंत्राचा वापर करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्रीपद विभागून मिळावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीची गेली दहा वर्ष आघाडी आहे. ज्या पक्षाला जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र सध्या आहे. ते बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केली आहे. पुण्यात बोलताना पवार म्हणाले, काश्मीरमध्ये काँग्रेसने जसं पहिल्यांदा पीडीपीला मुख्यमंत्रीपद दिलं. आणि नंतर उर्वरित वर्ष गुलामनबी आझाद यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारलं. हा मुख्यमंत्रीपद विभागून घेण्याचा जो नवीन फॉर्मुला काँग्रेसने आणला तो सर्वत्र लागू करावा. आणि हाच फॉर्मुला महाराष्ट्रातही लागू करावा असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं मत आहे अशी माहिती आर.आर. पाटील यांनी आपल्याला दिली असं पवारांनी सांगितलं. तसंच जागा जिंकून आणण्याची ताकद हाच निकष लोकसभेच्या जागावाटपात लावावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली. मागच्या निवडणुकीत काँग्रेसनं विधानसभेच्या 168 जागा लढवल्या. त्यात 100 जागी काँग्रेस हरली. एवढ्या जागा हरणं बरं नाही असा टोलाही पवारांनी यावेळी बोलताना काँग्रेसला लगावला.

close