इंडो-पाक बँडची पत्रकार परिषद शिवसैनिकांनी उधळली

February 4, 2014 6:30 PM3 commentsViews: 1075

sena rada04 फेब्रुवारी : भारत-पाक संयुक्त बँडची पत्रकार परिषद शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळून लावलीय. दोन्ही देशांमध्ये सलोखा निर्माण व्हावा, या उद्देशाने या संयुक्त बँडची स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या प्रेस क्लबमध्ये आज (मंगळवारी) त्याची घोषणा करण्यात येणार होती. पण, पत्रकार परिषद सुरू होताच शिवसेनेचे 30 ते 40 कार्यकर्ते आत घुसले आणि त्यांनी खुर्च्या फेकून राड्याला सुरूवात केली.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रमाचे पोस्टर फाडून फेकले . यानंतर आझाद मैदान पोलिसांनी कारवाई करत 30 ते 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या पत्रकार परिषदेत दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गिटारिस्ट मेकाल हसन यांचा हा बँड आहे. यात हसनसह बासरीवादक मुहम्मद अहसान पप्पू, ड्रमिस्ट आणि पर्कशनिस्ट गीनो बँक, गायिका शर्मिष्ठा चटर्जी यांचा समावेश आहे.

मेकाल हसन यांच्या बँडच्या या पुढाकारानं सांस्कृतिक क्षेत्रात एक इतिहास घडवला जाणार आहे. दोन्ही देशांतील समकालीन आणि शास्त्रीय संगीतकारांना या बँडच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न याा बँडमधून केला जाणार आहे. मात्र शिवसेनेनं याला कडाडून विरोध केलाय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही या हल्ल्याचा निषेध केलाय. शिवसेनेची पाकिस्तानबाबतची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली आहे, अशी टीका मलिक यांनी केली.तर अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीही अशाप्रकारची राडेबाजी योग्य नाही, दोन्ही देशांमधल्या कलाकारांमध्ये संवाद झाला पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केलीय.

सेनेची राडा संस्कृती

 • - जानेवारी 2013 : पाक हॉकी संघाला विरोध
 • -2012 : लेडीज क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाक महिला संघाला विरोध
 • - 2012 : वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये पाकिस्तानी ट्रेड फेअरच्या निषेधात घोषणाबाजी
 • -2011 : हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पाकीस्तानी कलाकारांना काम देण्यास विरोध
 • -2010 : बिग बॉसमध्ये पाकिस्तानी कलाकारांना सहभागी करुन घेतल्याच्या निषेधार्थ लोणावळा बंद
 • -1998 : गझलकार गुलाम अली यांची मैफल उधळली
 • -1991 : भारत-पाक क्रिकेट सामन्यांच्या आधी खेळपट्टी उखडली

 • Shyam Gaikwad

  हिंदुस्थान व भारतमातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर

  थलसेना, वायुसेना, नौसेना आणि साहेबांची ‘शिवसेना’……..

 • pravin

  पाकीस्तान या देशानी आपल्या देशात आज पावेतो केलेले हल्ले आणि आपल्या देशानी पाकीस्तानशी शांतता राखण्याबाबत केलेले प्रयत्न पाहता पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे संबध ठेवणे योग्य होणार नाही.

 • pravin

  शिव सेना या पक्षाचे क्रुत्य योग्य नसले तरी त्यांचा यामागचा हेतु योग्यच वाटत आहे. पाकीस्तान शी कोणताही संबध न ठेवल्यास पाकीस्तान मधील कलाकार व सर्व सामान्य लोक पाकीस्तान सरकार वर भारताशी चांगले संबध ठेवण्याबाबत दबाव निर्माण होइल.

close