67 लाखांची ‘टोल’फोड, मनसे कार्यकर्त्यांकडून होणार वसूल?

February 4, 2014 9:36 PM3 commentsViews: 811

45 mns attack tolls 404 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातल्या खेड-शिवापूर टोलनाका तोडफोडप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांकडून दंड वसूल केला जाण्याची शक्यता आहे. आंदोलनात 67 लाख 67 हजार रूपयांचं नुकसान झालंय. नुकसान भरपाई मनसेच्या आंदोलकांनकडून वसूल करावी, असा प्रस्ताव खेड-शिवापूर पोलिसांनी पुणे प्रांत अधिकार्‍यांकडे पाठवला आहे.

दरम्यान, मुंबईतही टोलफोड आंदोलनावरुन मनसे कार्यकर्त्यांना उपनगर जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी नोटीस बजावलीय. ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला गेलाय त्यांना नोटीस बजावण्यात आलीय. टोलफोड आंदोलनातून झालेलं नुकसान भरून देण्याचे मनसे कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले आहे.

राज्यात कुठही टोल भरु नका, कुणी अडवलं तर त्याला तुटवा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. राज यांच्या आदेशानंतर राज्यभरात दोन दिवस मनसेसैनिकांनी टोलची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज यांच्यावर चार गुन्हे दाखल झाले आहे.

close