अजूनही अंगणवाडी ताई मैदानातच!, आज होणार निर्णय?

February 5, 2014 11:16 AM0 commentsViews: 348

Anganwadi andolan 05 फेब्रुवारी : गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेलं राज्याभरातल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाने आता तीव्र वळण घेतलं आहे. काल (मंगळवारी)संपूर्ण दिवस राज्यभरातल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केले. कालची आख्खी रात्र त्यांनी आझाद मैदानात काढली. अजूनही हजारो अंगणवाडी ताई मैदानातच आहेत!

राज्याभरातल्या अंगणवाडी सेविकांचं त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. यावेळी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या मागण्या मन्या होईपर्यंत हे आंदोलन असचं सुरू ठेवणार असल्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

दरम्यान मंगळवारी संध्याकाळी अंगणवाडी सेविकांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनचा निर्णय आज होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे. तर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शन आणि मानधान वाढीबाबत काय निर्णय होतोय, तो पाहून त्यानंतरच संपाबाबत निर्णय घेतला जाईल, असं कृती समितीनं जाहीर केले आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या

  •  मानधनात वाढ हवी.
  • 4 हजार रु. मानधन नको.
  • 10 ते 15 हजार रु. वेतन द्यावं
  • 2005 पासून मागण्या प्रलंबित
  • अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर एकरकमी लाभ द्या
  • एक महिन्याच्या मानधनाएवढी भाऊबीज भेट द्या
  • योग्य पोषक आहार द्या
  • एक महिना उन्हाळी सुटी द्या
close