चंद्राबाबू नायडूंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

February 5, 2014 2:09 PM0 commentsViews: 1201

chandubabu udhav05 फेब्रुवारी :  तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे. नायडू हे एनडीएमध्ये येणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पण तेलंगणाच्या मुद्यावर एनडीएची भूमिका समजून घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

आंध्रप्रदेशचं विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. त्याला तेलुगु देसमचा विरोध आहे. या मुद्यावर शिवसेनेने त्यांना साथ द्यावी, असं मदतीची आवाहन करण्यासाठी चंद्राबाबूंनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आंध्रप्रदेशाचं विभाजन होऊ नये, यासाठी शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नायडू आज नवी दिल्लीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आहेत.

close