घराघरात वीज पोहचवणार- सोनिया गांधी

February 28, 2009 11:05 AM0 commentsViews: 2

28 फेब्रुवारी सोलापूरकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोलापुरातील फताटेवाडी इथे आल्या होत्या. त्यांच्या हस्ते सोलापूर औष्णिक उर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकल्पाचं भूमिपूजन दोन दिवसांपूर्वी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या पायाभरणी कार्यक्रमानंतर काँग्रेसची सभा याठिकाणी झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही सभा असल्याने सोनिया गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यासभेत बोलताना सोनिया गांधी यांनी देशात येत्या तीन वर्षात घराघरात वीज पोहचेल अशी घोषणा केली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात यूपीए सरकारने उर्जा क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याचा दावा सोनिया गांधी यांनी यावेळी केला.

close