घरांची अफवा, मंत्रालयात दुसर्‍या दिवशीही लोकांच्या रांगा

February 5, 2014 4:40 PM0 commentsViews: 629

home 3405 फेब्रुवारी : ‘कुणी घरं देत का घरं..’ अशी वणवण करणार्‍यांच्या हातात 54 हजारात घराचा फॉर्म पडला आणि मग काय स्वस्तात मस्त घर मिळणार म्हणून लोकांनी मंत्रालयात एकच गर्दी केली. पण ही स्वस्त घराची योजना बनावट असल्याच मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलंय.

पण तरीही मंत्रालयात लोकांची गर्दी कमी झालेली नाही. आज दुसर्‍या दिवशीही लोकांनी मंत्रालयात गर्दी केलीय. पवई एरिआ डेव्हलपमेंट अंतर्गत 400स्क्वेअर फुटांची घरं फक्त 54 हजारांना देण्यात येतील, अशा प्रकारचे फॉर्म दोन दिवसांपूर्वी वाटले गेले होते. तरीही आज दुसर्‍या दिवशीही मंत्रालयाबाहेर गर्दी उसळली आहे. मंत्रालयात जे तो कुणी येतो तो 54 हजारात घर कुठे मिळणार हा फॉर्म कुठे भरायचा अशी विचारणा करतांना दिसत आहे.

या बनावट फॉर्मसाठी लोकांकडून प्रत्येकी 10 ते 400 रुपयांपर्यंत घेण्यात आल्याची तक्रारही लोकांनी केली आहे. पवईमध्ये 54 हजारात घर मिळणार या अफवेने मंत्रालयाबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागल्यात. पवईमध्ये सरकारची गरीबांसाठी स्वस्त घरांची योजना आहे, महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे नेते मिलिंद रानडे यांनी ही पत्रकं वाटली होती. या योजनेची माहिती लोकांना दिली, असा रानडे यांचा दावा आहे. या स्वस्त घरांसाठी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज करा, असं आवाहनही केल्याची कबुली महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या मिलिंद रानडे यांनी दिली आहे.

आयबीएन लोकमतचे सवाल

- अर्जामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा पत्ता का देण्यात आला ?
- अर्जासाठी पैसे का गोळा करण्यात आले ?
- स्पष्टीकरण देण्यासाठी दोन दिवस का लावले ?
- आंदोलनाचा हा मार्ग योग्य आहे का ?
- ही मुंबईकरांच्या भावनांशी थट्टा नाही का ?

close