मुंबई पोलिसांना वाली कोण ?

February 5, 2014 6:15 PM0 commentsViews: 464

34 mumbai policeसुधाकर काश्यप, मुंबई

05 फेब्रुवारी : सत्यपाल सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा राजीनामा देऊन आता पाच दिवस झाले आहेत. मात्र, यानंतर ही नव्या पोलीस आयुक्तांची नेमणूक अजून ही झालेली नाही. यामागे आघाडीतलं राजकारण आहे? की निर्णय घेण्यात सरकार पुन्हा अपयशी ठरतंय? मुंबई पोलिसांना वाली कोण ?

सत्यपाल सिंग यांनी गेल्या शुक्रवारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा दिला. मुंबई हे संवदेनशील शहर आहे. इथे कधी गडबड होईल हे सांगता येत नाही, यामुळे या पदावर तात्काळ नेमणूक होणं आवश्यक होतं. मात्र,तसं झालेलं नाही. नव्या आयुक्तांची ताबडतोब नियुक्ती होण्यची आजवरची प्रक्रीया मोडीत निघाली आहे, अशी खंत माजी पोलीस अधिकारी वाय.पी.सिंग यांनी व्यक्त केलीये.

पोलीस आयुक्तांच्या नेमणुकीबाबत पोलीस अस्थापना समिती आहे. या समितीने नव्या पोलीस आयुक्तांचा प्रस्ताव राज्यसरकारकडे आधीच पाठवायला हवा होता. तसा प्रस्ताव या समितीने पाठवला नाहीये. तसंच त्याबाबत राज्य सरकार ही उदासीन दिसतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या मतभेदांमुळेही नेमणुकीला उशीर होत असल्याची चर्चा आहे. पण सर्वांचे याचे परिणाम पोलीस दलावर होत असल्याचं जाणकार सांगत आहे.

पोलीस आयुक्तांचा कार्यभार सध्या हेमंत नगराळे यांच्याकडे आहे. मात्र, सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण झालाय. याचं उत्तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे मुख्यसचिव, पोलीस महासंचालक यांना द्यावा लागणार आहे.

close