‘इमॅजिका’मध्ये रोलर कोस्टर राईडला अपघात, 2 जखमी

February 5, 2014 10:40 PM0 commentsViews: 1801

234 imagika 05 फेब्रुवारी : पुण्याजवळील खोपोलीमध्ये ऍडलॅब्स इमॅजिका पार्क या थीम पार्कमधील रोलर कोस्टर राईडला हा अपघात झाला. रोलर कोस्टर राईडचा एक कोच रूळावरून घसरल्यानं हा अपघात झाला.

या अपघातात 2 महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना खोपोलीच्या जाकोटिया नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मात्र सुरक्षेची सर्व काळजी घेतली गेली होती आणि याअगोदर असा प्रकार कधीही घडला नव्हता असं इमॅजिका पार्कनं स्पष्ट केलंय. मात्र या प्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याचं कळतंय.

close