बारावीच्या परीक्षा होणार, शिक्षकांचा संप मागे

February 5, 2014 11:22 PM0 commentsViews: 432

Image img_232992_upscexam_240x180.jpg05 फेब्रुवारी : 12 वीच्या परीक्षेवरचं संकट आता टळलंय. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या महासंघानेही बहिष्काराला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आज संध्याकाळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासोबत बैठक पार पडलीय. या बैठकीत बहिष्काराला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं.

मंगळवारी रात्री मुख्याध्यापक संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली होती त्यामुळे शिक्षकांच्या आंदोलनात फूट पडली होती. आज बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्यात.

याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषणा केली तर दुसरीकडे बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे वेळेवरच होती, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाबाबत कायम विनाअनुदानित यातून कायम हा शब्द वगळण्यात आलाय. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांचा याला पाठिंबा मिळेल आणि बारावीच्या परीक्षेत वेळेत होतील असं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलं. अखेर शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेतला असून उद्यापासून 12 च्या परीक्षांचा मार्ग मोकळा झालाय.

close