दिवसअखेर न्यूझीलंड 4 विकेटवर 329 रन्स

February 6, 2014 12:54 PM0 commentsViews: 254

new06 फेब्रुवारी : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसअखेर न्युझीलंडने 4 विकेटवर 329 रन्स केलेत.

पहिल्या सत्रात भारतीच्या बॉलर्सने तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. ईशांत शर्माने रुदरफोर्ड आणि टेलरला झटपट आऊट केलं तर झहीर खानने फुलटॉनची विकेट घेतली. पण यानंतर विल्यमसन आणि मॅक्युलमने इनिंग सावरली. या जोडीने दमदार बॅटिंग करत आपल्या सेंच्युरीही पुर्ण केल्या. विल्यमसन 113 रन्स करुन आऊट झाला तर मॅक्युलम 143 रन्सवर नॉटआऊट आहे.

वन-डे मालिकेत चारीमुंड्या चीत झाल्यानंतर भारतीय संघासमारो आजपासून सुरू झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रतिष्ठा वाचविण्याचे आव्हान आहे. भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून पहिली गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑकलंडमध्ये पावसाने हजेरी लावल्याने सामना १५ मिनीटे उशीराने सुरु झाला.

close