इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याची कबुली

March 1, 2009 1:51 AM0 commentsViews: 1

1 मार्च देशभरातल्या बॉम्बस्फोटात हात असल्याची कबुली इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी सादीक शेख यानं दिली होती. नेटवर्क 18 नं त्याचा हा कबुलीजबाब काल दाखवला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आता 7/11 च्या चार्जशिटमध्ये त्याचं नाव घालण्याचा निर्णय घेतलाय. अहमदाबाद बॉम्बस्फोटापूर्वी धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी सादिक ऑक्टोबर 2008 पासून मुंबई पोलिसांच्या ताब्यात होता. 2006 मध्ये मुंबईत रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवल्याची कबुली सादिकनं दिलीय. तरीही पोलिसांनी याबाबत त्याची चौकशी केली नव्हती. पण आता नेटवर्क 18 नं त्याचा कुबलीजबाब प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी चूक दुरूस्त केलीय. सादिक सध्या एटीएसच्या ताब्यात आहे. त्याचं नाव लवकरच चार्जशीटमध्ये दाखल केलं जाणार आहे.

close