बांग्लादेश रायफल्सच्या हेडक्वार्टरमध्ये सापडले मृतदेहांचे ढिगारे

March 1, 2009 1:57 AM0 commentsViews: 3

1 मार्च बांग्लादेश रायफल्सच्या ढाकामधल्या हेडक्वार्टरमध्ये मृतदेहांचे आणखी तीन ढिगारे आढळून आलेत. काल दहा मृतदेह सापडले होते. त्यात बीडीआरचे महासंचालक जनरल शकील अहमद यांची पत्नी नाझनीन यांचा समावेश आहे. शकील अहमद यांचा मृतदेह काल सापडला होता. त्यांचा मुलगा मात्र अजून बेपत्ता आहे. बांग्लादेश रायफल्सच्या जवानांनी बंड पुकारला होता. त्यावेळी हे हत्याकांड करण्यात आलंय. या बंडाची चैकशी करण्यासाठी विशेष लवादाची स्थापना करण्याची घोषणा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केलीय. हे हत्याकांड करणार्‍या जवानांना दया दाखवणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

close