‘आप’चा दणका, शीला दीक्षितांवर होणार गुन्हा दाखल

February 6, 2014 2:13 PM0 commentsViews: 1880
shila dixit06 फेब्रुवारी : कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश आज (गुरूवार) आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारने दिले.
दिल्लीतील ‘आप’ सरकार दीक्षित यांच्यावरील कारवाईबाबत दबाव होता. अखेर आज ‘आप’ सरकारने कॉमनवेल्थ घोटाळ्याचं प्रकरण अँटी करप्शन विभागाकडे सोपवून दीक्षित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान रस्त्यावरच्या दिव्यांच्या किंमती फुगवल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारने सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून शीला दीक्षितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांनी शंगलू समितीची स्थापना केलेली आहे.
close