मुलगी झाली म्हणून विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

February 6, 2014 5:13 PM0 commentsViews: 482

364 save woman 34506 फेब्रुवारी : मुलगाच हवा या हट्टामुळे बीड जिल्ह्यात एका महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. जरीना पठान असं या विवाहितेचं नाव आहे. या घटनेत ही महिला 60 टक्के जळाली असून बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

अजून या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाहीये. माजलगाव शहरातील फुलेनगर इथल्या जरीना पठान या महिलेने एक महिन्यापूर्वी एका मुलीस जन्म दिला तेव्हा पासून तीच्या घरच्या मंडळींनी तीचा छळ करायला सुरुवात केली.

एवढ्यावरच या नराधमांचं समाधान झालं नाही. त्यांनी जरीनाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. शेजारच्यांनी जरीनाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मुलीला जन्म दिल्यामुळेच घरच्या मंडळींनी हे कृत्य केलं असा जबाब या महिलेनं तहसिलदारांना दिलं आहे. या घटनेत सामील असलेल्यांविरूद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी जरीनाच्या आईनं केलीय. मुलगी झाली, म्हणूनच आपल्या सासरच्या मंडळींना आपल्या जाळून मारण्याचा प्रयत्न केला, असा जबाब जरीनानं पोलिसांकडे नोंदवला आहे.

close